ठळक बातम्या

पेट्रोल, गॅस दरवाढीवरून काँग्रेस आक्रमक

मुंबईत राजगृह ते चैत्यभूमी पदयात्रा
भाई जगताप-सप्रा यांनी केले नेतृत्व
मुंबई – पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात तसेच मोदी सरकारच्या धोरणांविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेसचे नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी रविवारी केला. गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली असली, तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांच्या मुद्यावरून मुंबई काँग्रेसने पदयात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेदरम्यान भाई जगताप बोलत होते.
महागाई, वाढत्या बेरोजगारीविरोधातील हे शक्तिप्रदर्शन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात स्मृती इराणी यांचे एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत? असे भाई जगताप म्हणाले. यावेळी वाढती बेरोजगारी आणि महागाई पदयात्रेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनीदेखील भाग घेतला होता. आगामी काळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मुंबईत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार, महागाई, बेरोजगारीविरोधात हे शक्तिप्रदर्शन आहे. मुंबईत त्याची सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यात राहुल गांधी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेऊन मोदी सरकारच्या धोरणांविरोधात बोलणार आहेत. त्याची साक्षीदार महाराष्ट्र आणि मुंबईची जनता राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
देशामध्ये वाढती बेरोजगारी व महागाईिवरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा व जनजागरण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे केंद्रातील माजी मंत्री, काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व मंत्री, काँग्रेसचे प्रमुख नेते, आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान म्हणजेच राजगृह ते दादर येथील चैत्यभूमी असा या पदयात्रेचा मार्ग होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …