ठळक बातम्या

पॅरोलवर सुटलेल्या दिराने केला भावापासून विभक्त वहिनीचा खून

नाशिकमधील संत कबीरनगर झोपडपट्टीतील घटना
नाशिक – आपल्या भावापासून विभक्त राहणाऱ्या भावजयीची दिराने हत्या केल्याची घटना संत कबीरनगर झोपडपट्टीत घडली. खुनाच्या प्रकरणात कारागृहाची हवा खात असलेला संशयित दीर काही दिवसांपूर्वीच कारागृहाबाहेर पडला असून, तो सुटल्यानंतर आपल्या भावजयीसमवेत राहत होता. बुधवारी (३ नोव्हेंबर) रात्री या दोघांत किरकोळ वाद झाल्यानंतर संतप्त दिराने धारदार सुऱ्याने २०-२५ वार करून वहिनीला संपवले. संशयित दीर पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताच्या मागावर पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत.
पूजा संदिप आंबेकर (२७, रा. संत कबीरनगर, महात्मानगर, नाशिक) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संतोष विष्णू आंबेकर असे फरार दिराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आंबेकर याच्यावर खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून पॅरोलवर सुटला असून, आपल्या भावापासून विभक्त राहणाऱ्या पूजा आंबेकर या भावजयीसमवेत गेल्या २० दिवसांपासून भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. बुधवारी रात्री ११च्या सुमारास किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद झाला. यावेळी संतप्त संतोष आंबेकर याने भावजयीवर धारदार सुऱ्याने सपासप २० ते २५ वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याने पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …