पुण्यात आजपासून नवे निर्बंध *पहिली ते आठवी शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद

पुणे – पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसत असून, मंगळवारी दिवसभरात तब्बल १ हजार १०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहे. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे पुण्यात बुधवारपासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसल्यास त्याला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, तसेच कुणी मास्क नसताना थुकताना दिसले, तर त्या व्यक्तीकडून थेट १००० रुपयांचा दंड घेतला जाईल, अशी घोषणा पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुणे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. या वर्गांचे ऑनलाइन क्लास सुरू राहतील, तर ९वी आणि १०वीचे वर्ग हे ऑफलाइन पद्धतीनेच सुरू राहतील, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाची स्थिती बिकट होत आहे. जिल्ह्यात ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राहिलेल्या नागरिकांनी लवकर लस घ्यावी. नागरिकांना विनंती आहे की, कठोर निर्णय लागू करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले. तसेच वेगवेगळ्या डिझाइनचे कापडी किंवा दोन प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. एन-९५ किंवा तीन प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा. त्याचबरोबर बुधवारपासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसेच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील, तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …