पुणे – पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात कायमच राजकीय आखाडा रंगलेला असतो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. मात्र, दिवाळी सणाच्या काळात बुधवारी (३ नोव्हेंबर) पुण्यातील प्रसिद्ध वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या गप्पा रंगल्याचे दिसून आले. एरव्हीचे राजकीय वाद विसरून सर्वच राजकीय पक्षांची नेतेमंडळी या ठिकाणी एकत्र पाहावयास मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात वाद झाला होता. हे वाद विसरून दोघांनी एकमेकांना लाडू चारले.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वाडेश्वर हॉटेलमध्ये कायमच वाडेश्वर कट्टा जमतो. या ठिकाणी बुधवारी दिवाळीच्या निमित्ताने माजी महापौर अंकुश काकडे, भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. मात्र, यात दिवाळीऐवजी राजकीय फटाकेच फोडण्यात आले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा दावा करण्यात आला. मात्र, कोणाला तरी एकाला विरोधात बसण्याची तयारी ठेवावी लागेल, हेही यावेळी निश्चित करण्यात आले.
पुणे हे विद्येचे माहेरघर आणि देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याची ही राजकीय संस्कृती जपण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे ठरविण्यात आले होते. या उपक्रमात महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेवक गोपाळ चिंतल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे, पुणे महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी नगरसेवक सतीश देसाई आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …