पुणे हादरले : ७ वर्षीय पुतणीला काकाने बनवले वासनेची शिकार

पुणे – पुण्यानजीकच्या मांजरी येथे नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या ७ वर्षीय पुतणीला वासनेची शिकार बनवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपी गोड बोलून मागील चार महिन्यांपासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण करीत होता, तसेच घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारेन, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही,
पण अलीकडेच आरोपीने पीडित मुलीचे लैंगिक शोषण केल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. पीडित मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत, आपल्या दीराविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो कलमासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्याजवळील मांजरी येथील एका सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत राहते. आरोपी काकाने पीडित मुलीशी गोड बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने पीडित मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. जून ते ६ डिसेंबर २०२१ पर्यंत हा धक्कादायक प्रकार सुरू होता. घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारेन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली होती. त्यामुळे पीडित मुलगी नराधम काकाचा लैंगिक अत्याचार निमुटपणे सहन करीत होती, पण पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी

जुन्नर – शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली, त्यानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसून …