पुणे : मुंढव्यात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

पुणे – मुंढव्यातील केशवनगरमध्ये एका दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. दोघेही राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या घरामध्ये रसायनाची पिंपे आढळली असून, गॅसही सुरू असल्याचे प्राथमिक तपासात आढळले. हा अपघात की, घातपात याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शरद हनुमंत भुजबळ (४७) आणि हेमा शरद भुजबळ (४३, दोघे रा. कुंभारवाडा, केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. रासायनिक दुष्परिणाम होऊन हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
शरद भुजबळ हे मोटार चालवून उदरनिर्वाह करीत असत. भुजबळ यांचा मित्र परवेज आलमची गाडी पंक्­चर झाली होती. त्यामुळे तो शनिवारी (६ नोव्हेंबर) त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधत होता, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे, तो रविवारी त्यांच्या घरी गेला. त्यावेळी भुजबळ दाम्पत्य त्याला मृतावस्थेत दिसून आले. घरातून गॅस व केमिकलचा उग्र वास येत होता. या प्रकाराबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुंढवा पोलीस ठाण्याच्या पथकाने, तसेच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. घरातील गॅस व टीव्ही सुरू होता. घरामध्ये मोठ्या प्रमाणात वायू साचल्याने दुर्गंधी येत होती. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

३६५ दिवस शिवजयंती साजरी करावी – राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. …