ठळक बातम्या

पुणे : नवले पुलावरील भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

डिझेल संपलेल्या ट्रकचा ब्रेक निकामी
पुणे – मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला ट्रकनंतर डिझेल टाकून सुरू केला जात असताना ब्रेक फेल झाले आणि हा ट्रक ताशी सत्तर किमीच्या वेगाने रिव्हर्स (उलटा) गेला आणि हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास डिझेल संपल्यामुळे एक ट्रक बंद पडला होता. त्यानंतर काही वेळाने चालकाने डिझेल आणून ट्रक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि तो ताशी ७० किमीच्या वेगाने मागे गेला. मागे जाताना या ट्रकने दोन-तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये काही दुचाकींचा देखील समावेश आहे. या ट्रकखाली चिरडले गेल्याने तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार ते पाच जण जखमी झाले.
ज्या पहिल्या कारला या ट्रकने धडक दिली, त्यामध्ये प्रवास करणारे दिल्लीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी निघाले होते, तर दुसऱ्या गाडीमध्ये नवीन लग्न झालेले जोडपे देवदर्शनासाठी कोल्हापूरला निघाले होते. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. तिसऱ्या गाडीमध्ये प्रवास करणारा प्रवासी भोसरीहून कामानिमित्ताने साताऱ्याकडे येण्यास निघाला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …