पुणे : अल्पवयीन मुलीला गर्भपातास भाग पाडणाऱ्या प्रियकरासह डॉक्टरलाही अटक

पुणे – शहरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शहरातील वडगाव शेरी परिसरात एका १६ वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेतील प्रियकर व साथीदारासह गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलीचे व आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पीडितेचा प्रियकर आरोपी अमित याने शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले होते. त्यामुळे तिला गर्भपात करावा लागला होता. आरोपी प्रियकराचा मित्र असलेल्या धनंजय रोकडे यानेही पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे, तर याचा व्हिडीओ प्रियकराने त्याच्या मोबाइलमध्ये तयार करून, सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी आरोपी प्रियकर अमित अबदेश यादव (१८, रा. निरामय हॉस्पिटलजवळ, वडगाव शेरी) व त्याचा साथीदार धनंजय नामदेव रोकडे (३८, रा. वडगाव शेरी गावठाण) यांच्यासह गर्भपात करणारे डॉक्टर अनिल बाळकृष्ण वरपे (५९, रा. वडगाव शेरी पुणे) यांना अटक केली आहे. वडगाव शेरी येथील एका सोसायटीच्या शेजारील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये हा गंभीर गुन्हा घडला. याप्रकरणी दोन आरोपींना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याच गुन्ह्यातील गर्भपात करणारे डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान करीत आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …