ठळक बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन सराईत वाहनचोर अटकेत

५१ दुचाकींसह ३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शंकर जगले (२०) आणि संतोष घारे (३५), अशी अटक आरोपींची नावे आहेत. तळेगाव दाभाडे येथे मोठ्या प्रमाणात कार चोरी होत असल्याचे समोर आल्याने तपास केला असता, पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ५१ दुचाकी-रिक्षा आणि मोबाइल, असा एकूण तब्बल ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी संतोष घारे याच्यावर वाहन चोरीचे २००हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये पाच सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून आठ पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर आणि ११ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने केली आहे. प्रताप ऊर्फ बाळ्या पवार, पंकज ऊर्फ बंडा पारीख, गौरव डोंगरे, शंकर वाडेकर आणि अजय सातपुते अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे पाचही आरोपी सराईत असून, त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment