उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
कल्याण/मुंबई – राज्यातील महानगरपालिका निवडणुका पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यात पॅनल पद्धतीने महापालिका निवडणुका घेऊ नका, असे या याचिकेत म्हटले आहे. कोविडचे कारण देऊन पॅनल पद्धतीने महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहे, मात्र यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईला यातून वगळण्याचे कारण काय?, मुंबईत कोरोना नाही काय?, असा सवाल या जनहित याचिकेतून करण्यात आला आहे.
कल्याणमधील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य सरकारसह निवडणूक आयोगालाही पक्षकार करण्यात आले आहे. राज्यातील आघाडी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून राज्यातील २२ महानगरपालिकांमध्ये पॅनल पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यातून मुंबई महानगरपालिके ला वगळण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका हद्दीत कोविड नव्हता का?, असा सवाल पाटील यांनी या याचिकेत केला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …