मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या कुटुंबासह नव्या घरात प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘कृ ष्णकुंज’ शेजारीच आहे. ‘कृ ष्णकुंज’ शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. या नव्या निवासस्थानी राज ठाकरे आपल्या कुटुंबासह प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असून, राज ठाकरे या इमारतीला काय नाव देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही नवी इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे.
‘कृ ष्णकुंज’ शेजारी बांधण्यात आलेल्या या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालयदेखील असणार आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालयदेखील उभारण्यात आले आहे.
राजकीय वतृर्ळामध्ये ‘कृ ष्णकुंज’ला विशेष महत्त्व आहे. आतापर्यंत ‘कृ ष्णकुंज’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. ही वास्तू अनेक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाची साक्षीदार राहिली आहे. मुंबईसह राज्यातील कामगारांना ‘कृ ष्णकुंज’ हे आपल्या हक्काचे ठिकाण वाटते. समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’वर आलेल्या नागरिकांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न मनसेच्या वतीने करण्यात आला. राज ठाकरे यांना भेटायचे झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते ‘कृ ष्णकुंज’वर येत असतात. आता राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांची अशीच वर्दळ राज ठाकरे यांच्या नव्या निवासस्थानी पाहायला मिळणार आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …