ठळक बातम्या

पाटणा : पाण्यासाठी रेल्वेतून उतरली अन्…

ओडिशातील तरूणीवर सामूहिक बलात्कार
पाटणा – पाटणा रेल्वे स्थानकावर एका तरुणीवर काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी बलात्कार केल्यानंतर, बेशुद्धावस्थेतील पीडित तरुणीला नग्नावस्थेत रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला. दुसऱ्या दिवशी काही स्थानिक नागरिकांना पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. शुद्धीवर आलेल्या तरुणीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पीडित मुलगी मूळची ओडिशा येथील रहिवासी असून, ती रेल्वेने कानपूरला चालली होती. बिहारची राजधानी पाटणा जंक्शनवर पाणी घेण्यासाठी पीडित तरुणी रेल्वेतून खाली उतरली, पण पाणी भरून रेल्वेकडे परत येईपर्यंत तिची गाडी सुटली. त्यामुळे ती पाटणा रेल्वे स्थानकावरील एका बाकड्यावर बसली. पीडित तरुणीला बाकड्यावर एकटीच बसलेली पाहून एक आरोपी तिच्याजवळ आला आणि काही मदत हवी आहे का? अशी विचारणा केली. यावेळी पीडितेने आपली ट्रेन चुकल्याचे आरोपीला सांगितले.
त्यावर आपण तुला पुढील ट्रेनमध्ये बसवून देतो, असे आरोपीने तिला सांगितले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर आरोपीने पीडितेला शीतपेय प्यायला दिले. हे शीतपेय प्यायल्यानंतर पीडित तरुणी बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत संबंधित आरोपी व त्याच्या काही साथीदारांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात लपून बसलेल्या एका नराधम आरोपीला अटक केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …