पहिलीतील प्रवेशासाठी किती वय हवे?

शिक्षण संचालनालयाचे स्पष्टीकरण
मुंबई – विद्यार्थ्यांना प्ले ग्रुप, नर्सरी, पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना विद्यार्थ्याचे नेमके वय काय असावे? याबाबत मागील वर्षी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यामध्ये ३१ डिसेंबर या तारखेपर्यंत विद्यार्थ्याचे वय सहा वर्षे पूर्ण असल्यास त्याला पहिलीमध्ये प्रवेश मिळू शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने ३० सप्टेंबर ऐवजी आता ३१ डिसेंबर अशी शिथिलता आणली. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमधील जन्म झालेल्या बालकांच्या प्रवेशाबाबतीत अडचणी निर्माण होऊ लागल्या. अनेक ठिकाणी प्रवेश घेताना पालकांना अडचणी येऊ लागल्या. हे पाहता शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या वयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी १ ऑक्टोबर, २०१५ ते ३१ डिसेंबर, २०१६ दरम्यान जन्मलेल्या आणि वयाची ६ वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी पहिली प्रवेशास पात्र असल्याचे स्पष्टीकरण संचालनालयाकडून देण्यात आले आहे. राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांना २०२२-२३ मधील नर्सरी, पहिली प्रवेशांसाठी हा नियम लागू राहणार आहे.
राज्यात राज्य मंडळाव्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएई, आयबी अशा विविध प्रकारचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश देताना विविध तारखा ग्राह्य धरून प्रवेश दिला जातो, तसेच पूर्व प्राथमिकमधील प्रवेशासाठी वयाची अट निश्चित नव्हती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन एकवाक्यता आणण्यासाठी आणि उपाययोजना सूचविण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. आता महिन्यांचे स्पष्टीकरण देऊन आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अडवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …