ठळक बातम्या

परमबीर सिंग यांनी निलंबन धुडकावले * ठाकरे सरकारविरोधात कोर्टात जाणार

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) संचालक परमबीर सिंग सध्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. खंडणीसारख्या गंभीर आरोपात परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. त्यावरून सुरुवातीला त्यांचे निलंबनही करण्यात आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नंतर स्वत: अडचणीत सापडले. परमबीर सिंग यांच्यावरही नंतर अनेक गंभीर आरोप झाले. त्यानंतर परमबीर सिंग काही काळ फरार झाल्याचे दिसून आले. मात्र सवार्ेच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्यानंतर परमबीर सिंग पुन्हा मुंबईत आले. सचिन वाझे प्रकरण बाहेर आल्यानंतर परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या. आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंग यांचे निलंबन करण्यात आले. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ठाकरे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईिवरोधात परमबीर सिंग न्यायालयातही जाणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सतत परमबीर सिंग विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पाहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची तात्काळ बदली करीत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांनी वाझेंना खंडणीचे टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि अनिल देशमुखांविरोधात सवार्ेच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयाचा रस्ता दाखवला. मुंबई उच्च सवार्ेच्च न्यायालयात आल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि देशमुखांच्या अडचणी वाढल्या. मात्र त्यानंतर सिंग यांच्यावरही खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप झाले. आणि त्यांचे निलंबन करण्यात आले. आता तेच निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता न्यायालयात धाव घेतल्यावर परमबीर सिंग यांना दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …