ठाणे – मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट ठाणे न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांकडून मदतीसाठी मलबार हिल पोलिसांना तसे पत्र दिले आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाण्यात कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.
२०१८ साली ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने एका प्रकरणात सोनू जालान आणि केतन तन्ना यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्याकरिता तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांनी सोनू आणि केतनकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू आहे. त्यानुसार ठाणे न्यायालयाने नुकतेच परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंह यांना अटक करून तात्काळ न्यायालयात हजर करण्यात यावे, असे या वॉरंटमध्ये म्हटले आहे. परिणामी परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडली आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …