ठळक बातम्या

पंतप्रधान मोदींचा आज केदारनाथ दौरा

आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट

नवी दिल्ली/देहरादून – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (५ नोव्हेंबर) केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला ८ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करणार आहेत. त्यानंतर ते श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास थांबणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन करणार आहेत. जवळपास १८० कोटी रुपयांच्या विकासकाम प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये संगम घाटाचा पुनर्विकास, प्राथमिक उपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृहे, पोलीस ठाणे, कमांड अँड कंट्रोल सेंटर, मंदाकिनी आस्थापथ, वर्षा आश्रय आणि सरस्वती नागरिक सुविधा भवन आदींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरस्वती आस्थापथ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्याशिवाय पूर्ण झालेल्या काही पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. सरस्वती रिटेनिंग वॉल आस्थापथ व घाट, मंदाकिनी रिटेनिंग वॉल आस्थापथ, तीर्थ पुरोहित हाऊस आणि मंदाकिनी नदीवरील गरुड चट्टीचेही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. येत्या काही महिन्यांत उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दौैऱ्याकडे लागले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …