चंदीगढ – पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी राज्यातील चन्नी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, पेट्रोलचे दर ५ रुपयांनी, तर डिझेलचे दर १० रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, मध्यरात्रीपासून पंजाबमध्ये पेट्रोल, डिझेलचे सुधारित दर लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतल्याने याचा फायदा काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो, असे बोलेले जात आहे. चंदीगढमध्ये या आधीच पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून देखील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याने, पेट्रोल पाच रुपयांनी, तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत, आता राज्य सरकारने देखील किमती कमी कराव्यात, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात येत होते. अखेर पंजाबमधील चन्नी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरानुसार पेट्रोल प्रति लिटर ५ रुपये, तर डिझेल प्रति लिटर १० रुपयांनी कमी करण्यात आले आहे.
पंजाब सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनेक लोकप्रिय निर्णय घेताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या माहागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, तसेच वीजदेखील प्रती युनिट तीन रुपयांनी स्वस्त केली होती. आता पुन्हा एकदा असाच निर्णय पंजाब सरकारकडून घेण्यात आला आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …