प्रकरण अंतिम टप्प्यात
नागपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात फडणवीसांनी आपल्या विरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. नागपूरमधील वकील सतीश उके यांनी फडणवीसांच्या विरोधात तक्रार केली होती.
या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी नागपूरच्या न्यायालयाने फडणवीस यांना त्यांच्या वकिलामार्फत आरोपांची माहितीही दिली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची सुनावणी सुरू होऊन साक्षी पुरावे सादर केले जाणार आहेत. याप्रकरणी दोषी आढळल्यास सहा महिन्यांची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
दरम्यान, फौजदारी खटल्यात आरोपीविरोधात आरोप निश्चित होणे आणि त्याची माहिती त्याला दिली जाणे ही सामान्य प्रक्रिया आहे. प्रत्येक फौजदारी खटल्यात या प्रक्रियेचा अवलंब केला जातो आणि तेच फडणवीसांच्या प्रकरणात झाल्याचे त्यांचे वकील उदय डबले यांनी म्हटले आहे. निश्चित करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात आमचा काय प्रतिवाद असेल हे आम्ही न्यायालयातच मांडू असेही उदय डबले यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …