ठळक बातम्या

नाशिक : साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव

शाळांबाबतचा निर्णय १० डिसेंबरनंतर – जिल्हाधिकारी
नाशिक – साहित्य संमेलनात लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. आता साहित्य संमेलनाच्या शेजारी चक्क लसीकरणाचा मांडव टाकण्यात येणार आहे. संमेलनस्थळी मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. साहित्य संमेलन आणि आढळलेला नवा ओमिक्रॉन विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी, पोलीस, आरोग्य, सुरक्षा, महानगरपालिका अधिकारी यांच्यासोबत संमेलन नियोजन समितीचे सदस्यही उपस्थित होते. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कडक निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी लसीकरणाशिवाय प्रवेश नाही. संमेलनस्थळी लसीकरणाची सुविधा असेल. फास्ट ट्रॅकप्रमाणे दोन प्रवेश द्वारे असतील. दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश, तर डोस न घेतलेल्यांनाच जागेवरच डोस देण्यात येणार आहे. ताप असेल तर तपासणी करूनच संमेलनाला यावे. ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांनी येऊ नये. परिसंवादात येणाऱ्या वक्त्यांना देखील दोन डोस अनिवार्य केले आहेत. मास्कशिवाय साहित्य संमेलन स्थळी प्रवेश नाही. मास्क संमेलन स्थळी फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या उपस्थितीवर पहिल्या दिवसापासून मर्यादा आहे. आता आसनव्यवस्थेत क्षमतेनुसार अंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन कार्यक्रमांच्या मध्ये संपूर्ण परिसर सॅनिटाइज केला जाणार आहे. दोन डोस झाल्यानंतर देखील कोरोना होतो, पण त्याची तीव्रता कमी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शाळांबाबत १० डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल. पहिली लाट येताना जी काळजी घेतली, तशाच पद्धतीने काळजी घेणार आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विमानतळ प्रशासनाने स्व घोषणापत्र घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …