नाशिकमधील मखमलाबाद कालव्यात तीन मुले बुडाली!

नाशिक – शहरातील मखमलाबाद रोड परिसरातील समर्थनगर येथील कालव्यात तीन लहान मुले बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. कालव्यातील पाण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे पाण्याच्या खोलीचा मुलांना अंदाज आला नाही. त्यामुळे ती बुडाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने धाव घेत या मुलांना कालव्याबाहेर काढले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
मखमलाबाद रोड परिसरात समर्थनगर येथे एक कालवा आहे. या ठिकाणी अनेक मुले खेळायला जातात. मंगळवारी गजवक्रनगर भागात असलेल्या नामको कॅ न्सर हॉस्पिटलमागे राहणारी तीन मुले या ठिकाणी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. खेळायला गेलेली ही मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली, पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ती पाण्यात बुडाली. निलेश मुळे, प्रमोद जाधव आणि सिद्धू धोत्रे अशी तिघांची नावे आहेत. जीवरक्षक दलाच्या जवानांनी तिघांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. या मुलांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास क रीत आहेत.
पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू झाल्याची ही महिन्यातील दुसरी घटना आहे. याच महिन्यात मित्रांसोबत खेळायला बाहेर पडलेल्या आठ वर्षांच्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आयान रफिक शेख असे या मृत मुलाचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीजवळील चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेजवळ अनेक खाणी आहेत. यंदा पावसाने डिसेंबर महिन्यातही हजेरी लावली. त्यामुळे या खाणींमध्ये पाणी साचले आहे. अनेक मुले या परिसरात दररोज खेळायला येतात. आयान हा तिघा भावंडासोबत या दगडी खाणीजवळच्या पाण्यात खेळायला गेला होता, मात्र खेळताना त्याचा पाय घसरला. तो खाणीच्या पाण्यात पडून बुडाला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …