नागपूर : पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात; चौघींचा मृत्यू

नागपूर – बोलेरो पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात ४ महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात इतर ५ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील ईसापूर-घुबडमेट रस्त्यावर रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. परिसरातील संत्र्याच्या बगीच्यात संत्री तोडण्यासाठी महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने जात होत्या.
पहाटे चारच्या सुमारास बोलेरो वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. त्यामध्ये तिघी जणींचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे अशी मृत महिला मजुरांची नावे आहेत. इतर पाच जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …