ठळक बातम्या

नांदेडमधील गाडीपुरा भागात हल्लाबोल; २४ जणांवर गुन्हा

क्षुल्लक कारणावरून हिंसा-तोडफोड, १३ जणांना अटक
नांदेड – किरकोळ कारणावरून महावितरणचे रोहित्र बंद पाडून गाडीपुरा छोटी दर्गा परिसरातून एका गटाने तुफान दगडफेक करीत तोडफोड, नासधूस केली. या घटनेने मंगळवारी रात्रीपासून या भागात प्रचंड तणाव आहे. या प्रकरणी २४ समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. या भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील गाडीपुरा भागात मंगळवारी सायंकाळी लहान मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर दोन्ही बाजूने भांडण मिटले. नंतर रात्री तलवारी, लोखंडी रॉड घेत शेकडो जण रस्त्यावर उतरले आणि महावितरणचे रोहित्र बंद पाडून या भागातील हिंदूंच्या घरावर तुफान दगडफेक सुरू केली. यावेळी नितीन विजयसिंह ठाकूर व सोनू संजयसिंह ठाकूर यांच्यावर या जमावाने सशस्त्र हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघेही जबर जखमी झाले. जमावाने तुफान दगडफेक करून दोन ऑटो, दुचाकी, रहिवाशांच्या घरांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे प्रचंड तणाव वाढला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अधिकारी व ताफाही दाखल झाला, परंतु जमावाने पोलिसांच्या पीसीआर वाहनाचीही नासधूस केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …