आईसह मुलांचा मृत्यू
नवी मुंबई – दिवाळीपूर्वी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८५ वर्षीय मोहिनी कामवानी या आपल्या कुटुंबासोबत वाशी परिसरात राहत होत्या. त्यांच्यासोबत मुलगा दिलीप कामवानी (६७ वर्षे) आणि मुलगी कांता कामवानी (६१ वर्षे) हेसुद्धा राहत होते. या तिघांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली. विष प्राशन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र तिघांचाही मृत्यू झाला. या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीे. मात्र, दिवाळीपूर्वी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनीही आर्थिक नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. तिघांनीही उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. औषध प्राशन केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …