अहमदनगर – येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत एकूण ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. त्यानंतर रविवारी या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाले. त्यावेळी ११ पैकी ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, तर चौघा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. एका मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, तर एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याचा डीएनए राखून ठेवण्यात आला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग लागल्यानंतर आग विझवणे, रुग्णांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविणे, रुग्णांचे जीव वाचवणे या सर्वांबाबत हलगर्जीपणा करणे, तसेच इतर अनुषंगिक कारणांमुळे ११ जणांचे मृत्यू आणि रुग्णांच्या दुखापतीस जबाबदार असलेल्या संबंधितांविरोधात भादंवि कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष वॉर्ड करण्यात आला होता. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचे अतिदक्षता विभागात रूपांतर करण्यात आले, मात्र ते करीत असताना अग्निसुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या दुर्घटनांनंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले होते. त्यात नगरच्या जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या अहवालात काही त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या. फायर अलार्म, स्प्रिंकलर, पाण्याचे पंप आदी यंत्रणा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्याची तातडीने पूर्तता करण्याची सूचनाही करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …