नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार

नराधमांनी हात-पाय बांधून दिल्या नरक यातना
अहमदनगर – जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील रामडोह येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका विवाहित महिलेवर चार जणांनी दोनवेळा सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी पीडित विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठला. आरोपींनी दुसऱ्यांदा अत्याचार केल्यानंतर पीडितेने नेवासा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह धमकी आणि अन्य कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष अप्पासाहेब गढेकर, शिवाजी पंढरीनाथ घुले, ऋषिकेष काकासाहेब गोरे आणि संदीप गोरख आगळे, अशी गुन्हा दाखल झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसून, घटनेचा तपास सुरू केला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, तीन महिन्यांपूर्वी पीडित विवाहित महिलेचे पती, मुली आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. यादरम्यान पीडित महिला घरी एकटीच होती. विवाहितेला घरी एकटे पाहून संबंधित चार आरोपी जबरदस्ती करीत तिच्या घरात शिरले. आरोपींनी पीडितेच्या तोंडात रूमाल कोंबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, तसेच आरोपींनी घटनेची कुठे वाच्यता केल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेने आरोपींचा अत्याचार निमूटपणे सहन केला. पीडित महिला आपल्या माहेरी गेली असता, आरोपींनी तिला फोन करून धमकी दिली होती. त्यामुळे संबंधित प्रकार पीडित महिलेच्या घरी देखील समजला होता. आठ दिवसांपूर्वी पीडित महिला शेतात एकटी झोपलेली असताना, आरोपींनी पीडितेचे हात-पाय बांधून तिच्यावर बलात्कार केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित विवाहितेने नराधम आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, ब्लॅकमेल अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …