मुंबई/ठाणे – कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला मोठे यश आले आहे. या मोहिमेत पोलिसांनी तब्बल २६ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलीस आणि सी-६० जवानांचे अभिनंदन के ले आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच, असा निर्धार यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी व्यक्त के ला.
पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे देखील हे मोठे यश आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पोलीस आणि नक्षली चकमकीत कारवाईत ४ पोलीसही जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. शासन त्यांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता ठेवणार नाही. नक्षलवाद्यांविरोधातली कारवाई यापुढेही अशाच पद्धतीने सुरू ठेवली जाईल, असे सूतोवाच शिंदे यांनी केले.
गडचिरोलीचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेल. शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन पालकमंत्री शिंदे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधातील ऑपरेशनची माहिती दिली. ही गेल्या वर्षभरातील मोठी कारवाई आहे. देशातीलही ही मोठी कारवाई आहे. ही कारवाई गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकित गोयल, समीर शेख आणि सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
जवान जखमी होऊनही चकमक सुरू होती. ९ ते १० तास चकमक सुरू होती. या कारवाईची इतर नक्षलग्रस्त राज्यांनीही दखल घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. तेलतुंबडेचा एन्काऊंटर हा इतर राज्यांतील नक्षल्यांनाही धक्का आहे, असे सांगतानाच गडचिरोलीत आता परिस्थिती नियंत्रणात आहे. भीतीचे वातावरण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला गडचिरोलीचा विकास करायचा आहे. त्या भागाचा विकास आम्ही डोळ्यांसमोर ठेवला आहे. जिल्ह्यात विकासकामेही सुरू झाली आहेत, असे त्यांनी सांगितले. मला धमकी देणारा यात मारला गेलाय का, याचा तपास पोलीस आणि गृहविभाग करेल. अशा अनेकवेळा धमक्या आल्या आहेत. त्याला मी घाबरलो नाही, असेही त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …