ठळक बातम्या

दोन वयोवृद्ध महिलांची राहत्या घरी हत्या; सिंधुदुर्गात खळबळ

दुहेरी हत्याकांडाने सावंतवाडी हादरली
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – दोन वयोवृद्ध महिलांच्या हत्याकांडाने सिंधुदुर्गात एकच खळबळ उडाली आहे. सावंतवाडी शहरातील भरवस्तीत राहणारी वृद्ध महिला आणि तिचा सांभाळ करणाऱ्या दुसऱ्या महिलेची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली आहे; मात्र हत्येचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. दोन्ही मृत महिलांच्या अंगावरील दागिने गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही दुहेरी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील उभा बाजार भागात ही घटना घडली. हत्या झालेल्या महिलेचे नाव निलीमा नारायण खानोलकर असे आहे, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या केअरटेकर श्यामली शांताराम सावंत यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजता नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर हे त्यांच्या घरी गेले असता, घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. शहरातील भरवस्तीत हत्या झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सावंतवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …