देशमुख-वाझे यांच्यातही भेट

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे संचालक परमबीर सिंग आणि निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यातील भेटीचा मुद्दा तापलेला आहे. त्यातच मंगळवारी वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट झाल्याची माहिती उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाझे-देशमुखांमध्ये तब्बल दहा मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे वसुली प्रकरणाला टर्न मिळणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चांदीवाल आयोगासमोर मंगळवारी सुनावणी होती. या सुनावणीसाठी सचिन वाझे आणि अनिल देशमुख आले होते. यावेळी वाझेंनी देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशमुखांनी वाझेंना टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र सुनावणी तहकूब झाल्यानंतर चांदीवाल यांच्या दालनातून बाहेर पडत असताना या दोघांमध्ये चर्चा झाली. तब्बल दहा मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या मुद्यावर झाली हे समजू शकले नाही. एका दालनात या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. वाझे आणि देशमुख बऱ्याच कालावधी नंतर एकमेकांना भेटल्याने या भेटीबाबतचे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
परमबीर सिंग आणि वाझे यांच्यात सोमवारी अर्धा ते पाऊणतास भेट झाली होती. या भेटीची माहिती उघड होताच एकच खळबळ उडाली. राज्य सरकारनेही या प्रकरणाची दखल घेऊन त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सिंग, वाझे, देशमुख यांच्या सुनावणीदरम्यान पोलिसांचा पहाराही वाढवला गेला आहे. असे असतानाही वाझे आणि देशमुख यांची भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या सुनावणीवेळी वाझेंची उलट तपासणी करण्याची माझ्या वकिलांना परवानगी द्यावी, अशी विनंती देशमुख यांनी चांदीवाल आयोगाला केली आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …