ठळक बातम्या

देगलूरच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा फोन

‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे अभिनंदनाचा वर्षाव!
नांदेड – जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळविला. अंतापूरकरांनी भाजपच्या सुभाष साबणे यांना आस्मान दाखवले. पण हा विजय शक्य झाला तो काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्या नियोजनाने आणि त्यांच्या परिश्रमाने! मंगळवारच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी फोन केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून देगलूरच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
देगलूरचा निकाल दुपारी ३.३० च्या सुमारास स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. गेल्या महिनाभर केलेल्या कष्टाचे चीज झाल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केल्या. सोनिया गांधी यांनी जितेश अंतापूरकर यांच्या राजकीय आयुष्याला शुभेच्छा देताना चांगले काम कराल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …