दिवाळी सुट्ट्यांचे समायोजन होणार

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी
मुंबई – दिवाळीच्या सुट्ट्या शिक्षण विभागाच्या आधीच्या परिपत्रकाप्रमाणे कमी झाल्या असतील, तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे देण्यात याव्यात, अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण संचालकांकडून काढण्यात आले आहे. १२ नोव्हेंबरला नियोजित राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण (एनएएस) परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात अथवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन या सुट्ट्यांचे समायोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी त्यासोबतच सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांना स्थानिक पातळीवर शाळांना सुट्टी कधी वाढवून देण्यात येणार, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या २८ ऑक्­टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान देण्यात आल्या असल्या, तरी शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने या सुट्ट्या १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण परीक्षा झाल्यानंतर २० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात येऊ शकतील. त्यामुळे या परिपत्रकानुसार दिवाळीच्या सुट्ट्या या १० नोव्हेंबरनंतर १२ नोव्हेंबरची परीक्षा झाल्यानंतर २० नोव्हेंबरपर्यंत मिळू शकतील.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलेल्या इतर सरकारी कामांमुळे ज्यांच्या सुट्ट्यांवर परिणाम झाला आहे, त्यांच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. त्यांना या सुट्ट्या नंतर घेता येणार आहेत. दिवाळीत शाळेत यावे लागल्याने अनेक शिक्षकांच्या सुट्ट्या वाया गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर पाठवपुरावा करण्यात येत होता, त्याला यश आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …