मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. तुम्ही लवंगी लावली; मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या यावेळी म्हणाले की, दिवाळी येत आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात; पण किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके वाजवणार आहे. एक दोन नाही, तर पूर्ण आठ जणांचे फटाके फोडणार आहे. दिवाळी ते देवदिवाळी या काळात एक-एक करून घोटाळे उघड केले जातील. यांनी गेले १२ दिवस नौटंकी केली; मात्र आता तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयांचे तीन घोटाळे बाहेर काढले जातील, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
राज्यात उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यांवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष विचलित करायचे होते. गेले १३ दिवस नवाब मलिक यांनी बेछूट आरोपांचे सत्र लावले आहे. आधी ट्विट करतात, मग फेसबुकवर जातात, मग पत्रकार परिषद घेतात. १३ दिवस चाललंय काय, समीर वानखेडे हिंदू नाही मुस्लीम, क्रांती रेडकर तुझं लग्न हिंदू पद्धतीनं झालं; पण तुझा पती मुस्लीम आहे. त्याचा पहिला निकाह मुस्लीम पद्धतीने झाला होता. त्याच समीरचे वडील ज्ञानदेव नाही, तर दाऊद आहेत. त्याचा बाप दाऊद नाही, तर तुमच्या सरकारचे पालक असलेल्या शरद पवार यांना जाऊन विचारा की, १९९३-१९९४ मध्ये दाऊदसोबत विमानाने कोण बसलं होतं ते?, अशी बोचरी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …