ठळक बातम्या

दहिसर चेकनाका येथून २४ किलो काश्मिरी चरस जप्त


गुन्हे शाखेकडून चार जणांना अटक
मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. मंगळवारी मुंबईत एक मोठी कारवाई करण्यात आली असून, दहिसर चेकनाका येथून एका गाडीतून २४ किलो काश्मिरी चरस जप्त केलं आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलं असून, यात २ पुरुष आणि २ महिला आरोपींचा समावेश आहे.
पोलिसांनी दहिसर चेकनाका येथे सापळा रचून ही कारवाई केली. तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दर महिन्याला काश्मीरला जात होते आणि दर महिन्याला २५ ते ३० किलो चरस काश्मीरहून मुंबईला आणत होते. यातील मुख्य आरोपीचे नाव बंडू उदमशिळे असे असून, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. बंडू उदमशिळे याला याआधी २०१०मध्येही अटक करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १४ कोटी इतकी किंमत असल्याचे सांगितले जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …