ठळक बातम्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण परीक्षेआधी करावे

बोर्डासह शिक्षक-पालकांची मागणी
मुंबई/पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेआधी प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी बोर्डासह शिक्षक आणि पालकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रात १५ मार्चला इयत्ता दहावीची आणि ४ मार्चला इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे. राज्यातून दहावी आणि बारावीचे मिळून २६ लाखांवर विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.
राज्यात ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेतली जाणार आहे. यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी बोर्डाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर शिक्षक आणि पालकांनी सुद्धा बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी केली आहे.
राज्यात बोर्ड परीक्षेच्या कामात सहभागी होणाऱ्या दोन ते अडीच लाख शिक्षकांना प्राधान्याने बुस्टर डोस देण्यात यावा, जेणेकरून बोर्ड परीक्षा सुद्धा सुरळीत पार पडतील, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असेही मत शिक्षकांनी मांडले आहे.
दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये होणार आहेत. तसेच, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंच होणार आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …