दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच

१७ नंबरचे अर्ज भरण्यासही मुदतवाढ
पुणे – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणे अशक्य असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची ऑफलाइन परीक्षांची तयारी सुरू आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी १७ नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय मंडळाला कळालेला नाही. ऑफलाइन पद्धतीने ३६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे मंडळाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. १७ नंबरचा फॉर्म भरून १२ वी आणि १० वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यास मुदत वाढवण्यात आली आहे. १२ जानेवारीपर्यंत अतिविलंब शुल्कासह त्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : दहावी – ँ३३स्र://ाङ्म१े17.ेँ-२२ू.ंू.्रल्ल ?????? व बारावी – ँ३३स्र://ाङ्म१े17.ेँ-ँ२ू.ंू.्रल्ल ??????
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सद्यस्थितीत दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले असल्याचे सांगितले आहे.
पूर्व परीक्षांवर संकट
राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दैनंदिन वाढत चालला आहे. ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांपुढे दहावी आणि बारावीच्या पूर्व परीक्षा कशा घ्यायच्या? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दहावी-बारावीच्या पूर्व परीक्षा ऑफलाइन घ्यायच्या की ऑनलाइन असा प्रश्न शाळा-महाविद्यालयांसमोर आहे. शाळा-महाविद्यालयांनी दहावी-बारावीच्या पूर्व परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीत प्रस्तावित केल्या होत्या. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पूर्व परीक्षा कशी पार पडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …