…तोपर्यंत लॉकडाऊनचा विचार नाही – राजेश टोपे

पुणे – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत तरी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले. राजेश टोपे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. जिथे काही प्रॉब्लेम नाही, तिथे लॉकडाऊनचा विषय नाही. ४० टक्क्यांच्यावर बेड्स भरल्यानंतर लॉकडाऊनचा विचार करणार, मात्र आता तशी परिस्थिती नाही. आता १० टक्केही बेड्स भरलेले नाहीत, असे टोपेंनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार यांच्यासोबत मंगळवारीच माझी बैठक होती. केंद्राने जो निधी दिला आहे, तो वेगळ्या गोष्टींसाठी खर्च होणार आहे आणि तो वेळेत कसा खर्च होईल याकडे आमचे लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …