मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडल्या याबाबत बुधवारी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली, तसेच या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापन करण्यासाठी विचारले होते, असेदेखील त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या या वक्तव्यांवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शरद पवार यांना चांगलेच टोले लगावले आहेत. तुमचा इतिहास खरे न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मोदी यांनी आपण एकत्र सरकार स्थापन करू असे सांगितले होते, असे भाष्य शरद पवार यांनी केले होते. तसेच अजित पवार यांनी शपथ का घेतली?, शरद पवार यांनी त्यांना पाठवले होते का? हे मला समजणार नाही. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण मी शरद पवार यांना एकच प्रश्न विचारेन की, हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले?, तुमचा इतिहास खरे न बोलण्याचा आहे. त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्यावर विश्वास कोण ठेवणार?, मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का?, हा मोठा प्रश्न आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याबाबत बोलताना त्यांचा पत्ता सांगायला मी काय मूर्ख आहे का?, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. राणे सर्वांना पुरून उरणार आहेत. नारायण राणे तसेच नितेश राणे यांच्या स्टेटमेंटवर ते कमेंट करीत नव्हते. बराच काळ ते बोलण्याचे धाडस करीत नव्हते. नारायण राणे यांना नोटीस पाठवणे हा हस्यास्पद प्रकार आहे, पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये ॲक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचे अशीच परंपरा सुरू झाली आहे, असे पाटील म्हणाले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …