मुंबई – बांगलादेशात हिंदंूवर अत्याचार होत आहेत, तर त्याचे पडसाद फक्त महाराष्ट्रात का उमटत आहेत?, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकात पडसाद का उमटत नाहीत?, यामागे काय षड्यंत्र आहे?, असे सवाल करतानाच जर खरोखरच हिंदू असुरक्षित आहे, असे वाटत असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. मोदी-शहांना जाब विचारावा. आम्ही तुमच्या सोबत येऊ, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोहन भागवतांना हे आव्हान दिले. काश्मीरमधील पंडितांच्या हत्या होत आहेत. जवानांच्या हत्या सुरू आहेत. त्या बांगलादेशातील घटनांपेक्षा भयंकर आहेत. त्यासाठी समस्त राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र यावे आणि दिल्लीत मोठा मोर्चा काढावा. खरोखरच ‘हिंदू खतरे में है’ असे वाटत असेल, तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी या मोर्चाचे नेतृत्व करावे, करणार आहात का नेतृत्व?, हिंदूंबाबत आपल्या देशात काय चालले आहे याचा जाब त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विचारावा, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि रझा अकादमी म्हणते त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. मग हे कोण करत आहे? त्याचे उत्तर मिळायला हवे असे राऊत म्हणाले. रझा अकादमी काय म्हणते मला माहीत नाही, पण महाराष्ट्रात हिंसाचार किंवा दंगली घडवण्याइतकी ताकद किंवा समर्थन रझा अकादमीकडे कधीच नव्हते. खरेतर त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद का उमटावे?, त्रिपुरात असे काय घडले की, त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटावी?, बांगलादेशमध्ये मंदिरामध्ये हल्ले झाले म्हणून त्रिपुरात मोर्चे निघाले. त्यात मशिदींवर दगडफेक झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याचे सांगतात. मग महाराष्ट्रातच का?, उत्तर प्रदेशात का नाही?, दिल्लीत का नाही?, बिहारमध्ये का नाही?, कर्नाटकात का नाही?, फक्त महाराष्ट्रात का?, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचे काही तरी कारस्थान आहे असे वाटते, असा आरोप त्यांनी केला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …