मुंबई – ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. आज गोपीनाथ मुंडे असते, तर त्यांनी केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिले असते, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करीत आहोत. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप कायदेशीर फंडे वापरत आहे. जनतेने हे लक्षात घ्यायला हवे. ओबीसींच्या आरक्षणाविरोधात कोण आहे? ते जनतेने समजून घ्यावे. त्यामुळे भाजपला धडा शिकवला पाहिजे, असे भुजबळ यांनी सांगितले.
इम्पिरिकल डेटा द्यावा अशी आमची मागणी आहे. भले तो सदोष का असेना, पण केंद्राने हा डेटा दिला पाहिजे. आम्ही त्या चुका दुरुस्त करू, पण डेटा द्या. इम्पिरिकल डेटा देणे ही केंद्राची जबाबदारी होती. उज्ज्वला योजना देताना या डेटाचा केंद्र सरकारने वापर केला होता. मग आम्हालाच हा डेटा का दिला नाही? भाजप सरकारला ओबीसींना आरक्षणच द्यायचे नाही, असे सांगतानाच आज गोपीनाथ मुंडे असते, तर भाजपकडून ओबीसी आरक्षणाला विरोध झाला नसता. त्याचे दु:ख आमच्या मनात आहे, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी ओबीसी आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणार आहे, याकडे आमचे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …