ठळक बातम्या

…तर क्लायमॅक्स मी करणार – नितेश राणे

मुंबई – मुंबई ड्रग्ज प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओने मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्म दाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलाशानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितले, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत सोमवारी असे म्हणाले की, इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की, क्लायमॅक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला.
प्रभाकर साईल नावाचा व्यक्ती पुढे येतो. तो कोण होता?, काय होता?, त्याची पार्श्वभूमी काय?, गेल्या १०-१५ दिवसांत तो कुणाशी बोलला?, या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. प्रभाकर साईल जे बोलतोय ते तुम्ही सत्य मानत असाल, तर मग सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुशांतचा सर्वात जवळचा मित्र गणेश हिवरकर नावाचा व्यक्ती होता. तो वारंवार टीव्हीवर सांगत होता, तो माझ्या घरी आला, त्यावेळी एक आमदार मित्र माझ्यासोबत होते. त्याने मला सांगितले आहे की, सुशांतसिंह आणि दिशा सॅलियन प्रकरणात नेमके काय झाले आणि त्याला कसे धमकावले गेले. आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री कसा त्याला भेटायला बाळासाहेब ट्ऱॉमा हॉस्पिटलमध्ये आला, किती वाजता भेटायला आला आणि तो नेमके त्याच्याशी काय बोलला? हे सगळे संभाषण त्याने मला आणि माझ्या आमदार मित्राला सांगितले आहे.
त्याची सगळी साऊंड रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. प्रभाकर साईल जे बोलतोय ते तुम्ही खरे मानताय आणि माध्यमांमध्ये चालवताय, मी जेव्हा ही साऊंड क्लिप जनतेसमोर आणेन, तेव्हा हिवरकर जे बोलतोय ते खरे समजून तुम्ही संबंधितांवर कारवाई करा आणि चौकशी करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …