ठळक बातम्या

ठाण्यात क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या

तीन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात; एक जण फरारी
ठाणे – टपली मारण्याच्या क्षुल्लक वादातून झालेल्या वादात दहावीतील विद्यार्थ्याची छातीत चाकू भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या परिसरात घडली. यामध्ये १५ वर्षीय तुषार साबळे याचा मृत्यू झाला. वागळे इस्टेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून, एकजण फरारी आहे. चारही हल्लेखोर अल्पवयीन असून, या हत्येमागे शाळेतील भांडणाची पार्श्वभूमी आहे.

वागळे इस्टेट येथील कामगार हॉस्पिटल रोडवर राजीव गांधी नगरात राजश्री शाहू महाराज विद्यालय असून, त्यात दहावीत तुषार साबळे शिकत होता. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या मुलांचा आवारात वाद सुरू होता. त्याठिकाणी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने पकडून त्याच्या छातीत धारदार चाकू खुपसला. या घटनेनंतर स्थानिकांनी तुषारला जवळच असलेल्या प्रगती रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात नेण्याआधी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी पथकासह याठिकाणी धाव घेत तीन अल्पवयीन हल्लेखोरांना ताब्यात घेतले, तर एका फरारी हल्लेखोराचा शोध सुरू असल्याची माहिती दत्तात्रय ढोले यांनी दिली.
भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या तुषारला अल्पवयीन हल्लेखोरांनी भोसकल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, पुढील तपास सुरू असल्याचे परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …