ठळक बातम्या

ठाकरे सरकारने जागा बळकावण्याचे काम केले – किरीट सोमय्यांचा आरोप

अलीबाबा आणि ४० चोरांचा हिशेब ३१ डिसेंबरपर्यंत देणार
मुंबई – कोविड लॉकडाऊन घोषित केले. त्या काळात रुग्णालये बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम ठाकरे सरकारने केले, असा आरोप रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. ते मुलुंडमध्ये बोलत होते. सोमय्या म्हणाले, ११ नोव्हेंबर २०२० ला पहिला घोटाळा काढला. आता आणखी काही नवे येणार आहेत. अलीबाबा आणि ४० चोरांचा हिशेब येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ठेवणार आहे. आता माझादेखील अनिल देशमुख होणार, असे कोणाला वाटते. नवाब मलिकांना माहिती असावी, असा टोला त्यांना हाणला. अन्वय नाईकसोबत त्यांचे काय संबंध आहेत?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन फाईलींवर सह्या केल्या. एक मेट्रो आणि दुसरी एक जमीनसंदर्भात आहे. हे सरकार लुटारू आहे. पंतप्रधानांची शपथ भ्रष्टाचार संपवणार अशी आहे, मात्र हे काय वेगळीच शपथ घेतात, अशी कोपरखळी त्यांनी मारली.
सोमय्या म्हणाले, आम्ही जालन्याला गेलो. तिथे शिवसैनिक आले, मात्र आम्ही घाबरलो नाही. सात कोटी कार्यालयात आले कुठून?, त्याची चोरी झाली कशी?, हे ईडीला सांगितले. ईडीने चौकशी सुरू केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनादेखील नोटिसांवर नोटिसा आल्या. त्यानंतर त्यांना जाग आली आणि ईडीबाबत बोलणे महागात पडले. त्यांनी ईडीला विनंती केली. ५५ लाख चोरीचे पैसे परत केले. मोदींनी माफ केले. नाही तर संजय राऊत यांचादेखील नंबर होता, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सोमय्या म्हणाले की, कोविड लॉकडाऊन घोषित केले. रुग्णालये बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम ठाकरे सरकारने केले. शेवटी आम्ही राज्यपालांकडे गेलो. त्यानंतर ठाकरे यांनी पाठ फिरवली आणि सर्व पेपर फाडले. आम्ही त्या ठिकाणी काहीही रुग्णालय बांधणार नाही, असे सांगितले. खरेतर हे रुग्णालय बांधण्याचे काम नव्हते, कोविडखाली जमीन लाटण्याचे काम होते. जनता जागी झाली आहे. घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …