अनैतिक संबंधांना मान्यता देण्यासाठी पत्नी-सासूचा दबाव
टिटवाळा (ठाणे) – येथील एका डॉक्टरने केलेल्या आत्महत्येचे गूढ उकळण्यात टिटवाळा पोलिसांना यश आले आहे. अविनाश देशमुख (३२) या डॉक्टरने १२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आत्महत्येची नोंद करीत पुढील तपास सुरू केला होता. आपल्या अनैतिक संबंधांना मान्यता द्यावी, म्हणून पत्नी आणि तिची आई डॉक्टरवर मानसिक दबाव आणत होत्या. याच मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टरने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
टिटवाळा पूर्वेला नारायण रोड परिसरात मोहन हाइट्स या इमारतीत डॉ. अविनाश देशमुख हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. अविनाश यांची पत्नीही डॉक्टर आहे. अविनाश हे इंदिरा नगर परिसरात आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस करीत होते. अविनाश यांची पत्नी डॉ. शुभांगी देशमुख हिचे आपल्या मामे भावासोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध आपल्या पतीने मान्य करावेत, यासाठी डॉक्टर पत्नी आणि तिची आई डॉ. अविनाश यांच्यावर दबाव टाकत होत्या. तसेच यावरून त्यांचा मानसिक छळही करीत होत्या. याशिवाय सासू-सासऱ्यांसोबत राहायचे नाही, त्यामुळे वेगळे घर घे, असा तगादाही शुभांगी हिने पतीकडे लावला होता. या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. अविनाश देशमुख यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …