जोपर्यंत हे प्रकरण तडीस नेत नाही, तोपर्यंत थांबणार नाही – नवाब मलिक

मुंबई – हे काय आम्हाला धमक्या देत आहेत, यांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. मी विधानसभेत जे प्रकरण आणणार आहे, ते समोर आल्यानंतर भाजपचा नेता व कार्यकर्ता जनतेसमोर जाऊ शकणार नाही, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. आज ज्यांच्यावर आरोप होते ते बाहेर आले आणि जे आरोप करत होते ते आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत. एकंदरीत सिनेमाचा सिक्वेन्स बदलला आहे. त्याचा अंत तर होणारच आहे आणि जोपर्यंत हे प्रकरण धसास लावत नाही, तोपर्यंत थांबणार नाही, असा इशाराही मलिक यांनी दिला.
—————————————
काही तरी गौडबंगाल सुरू
भाजपचा एक दूत जो माजी मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये होता तो जाऊन समीर वानखेडेला ईडीच्या कार्यालयात भेटतोय. तो इतका जवळचा आहे की, माजी मुख्यमंत्री त्याच्या घरीही जात होते. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये सहज प्रवेश होता. तो चेंबूरमध्ये राहतो. जेव्हापासून मी हा विषय लावून धरला आहे, तिथपासून हा गृहस्थ ईडी कार्यालयात जात आहे. तो का जातो?, कुणासाठी जातो?, कुणाच्या मनात काय भीती आहे?, हे सगळं फर्जीवाडा करून सुपारी वाजवण्याचे काम होते का?, असे अनेक सवाल नवाब मलिक यांनी यावेळी उपस्थित केले आहेत. काही तरी गौडबंगाल या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून चाललंय?, हा का जातो आणि कशासाठी, याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेंवर भाजपचे प्रेम असेल, तर त्याला उघडपणे भेटा ना, दूताच्या माध्यमातून कशाला भेटता. संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काही तरी गौडबंगाल सुरू आहे. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
—————————————-
वानखेडे जन्मापासूनच मुस्लीम
समीर वानखेडे यांनी धर्म बदलला नाही, हे तुम्ही बोलत आहात हे सत्य आहे, कारण ते जन्मापासूनच मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांनी धर्म बदलला होता. दोन्ही मुलं लहानपणापासून मुस्लीम आहेत. ते मुसलमान पद्धतीने जगले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …