जीन्सवाल्या पोरींना मोदी आवडत नाहीत

दिग्विजय सिंह यांचे वादग्रस्त विधान
भोपाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जीन्स परिधान करणाऱ्या मुलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. केवळ ४० ते ५० वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले आहे. दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भोपाळमध्ये जन जागरण अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. जीन्स परिधान करणाऱ्या आणि मोबाइल बाळगणाऱ्या मुली मोदींमुळे प्रभावित नाहीत. केवळ ४० ते ५० वयोगटातील महिलांच मोदींवर प्रभावित आहेत, असे सांगतानाच २०२४ मध्ये मोदी पुन्हा विजयी झाल्यास सर्वात आधी देशाचे संविधान बदलले जाईल. जे काही आरक्षण मिळतेय तेही बंद केले जाईल. कारण भाजप रशिया आणि चीनचे मॉडल फॉलो करीत आहे, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.
यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवरही हल्ला चढवला. मध्य प्रदेशात सर्वाधिक बजरंग दलाचे गुंड आहेत. या गुंडांना पोलिसांची साथ आहे, अशी टीका त्यांनी केली. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांना मारले गेले. ज्या व्यक्तीने हत्या केली, त्याला तुम्ही नोकरी दिली. राज्यातील सरकार आणि पोलीस बजरंग दलाला वाचवत आहे. हे मोदींचे सरकार आहे. शिवराज मामूंची वाळू माफियांची गँग आहे. आता त्यांच्याविरोधात लढले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …