ठळक बातम्या

जाहीरपणे माफी मागा, नाही तर… अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस

मुंबई – मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणात रान उठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच मुंबईत ड्रग्जचा काळा धंदा सुरू झाल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. भाजपच्या अन्य नेत्यांवरही मलिकांनी आरोपांची मालिका सुरू केली आहे. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेला जयदीप राणाचा एक फोटो पोस्ट केला होता. हा जयदीप राणा ड्रग्ज तस्कर असल्याचेही मलिक म्हणाले होते. त्यावरून आता अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने राज्यात ड्रग्ज उद्योग चालत असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. हा आरोप करण्यापूर्वी मलिक यांनी एक फोटो ट्विट केला होता. त्यात अमृता फडणवीस आणि जयदीप राणा पाहायला मिळत होते. अमृता फडणवीस यांनी मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासंदर्भात गायलेल्या गाण्याला अर्थसाह्य जयदीप राणा याने केले होते, असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
मलिकांच्या या आरोपानंतर अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी मलिकांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुढील ४८ तासांत मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असा इशाराच अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नोटीसचे काही फोटोही शेअर केले आहेत.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …