जळगाव : पैशांच्या पावसाचा हव्यास; भाच्याने मावशीला घनदाट जंगलात नेऊन जिवंत जाळले

जळगाव – पैशांच्या पावसाच्या आमिषाने जळगावात महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मांत्रिकासह महिलेच्या चुलत भाच्याला ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेला घनदाट जंगलात नेऊन भाच्याने मांत्रिकाच्या मदतीने अघोरी प्रकार केल्याचा आरोप आहे. ५१ वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने गोड बोलून जंगलात नेले. पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून त्याने मावशीला जिवंत जाळले. त्यानंतर एका खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला. माया दिलीप फरसे, असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी संतोष मुळीक या मांत्रिकासह माया फरसेंचा चुलत भाचा अमोल दांडगे याला ताब्यात घेतले आहे. माया फरसे या शहरातील शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौक भागात राहत होत्या. त्या सारथी पापड कारखान्यात काम करीत होत्या.
घटनेच्या दिवशी म्हणजेच १५ डिसेंबरला माया फरसे नेहमीप्रमाणे सकाळी ९.३० वाजता कारखान्यात कामाला जाण्यासाठी निघाल्या. मात्र संध्याकाळ झाल्यानंतरही त्या घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही नातेवाईकांना त्या सापडल्या नाहीत. अखेर त्यांच्या पतीसह कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही कॅ मेरे तपासले असता, माया फरसे आणि त्यांचा चुलत भाचा अमोल दांडगे एकत्र चालताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी अमोलला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासातून अमोलने मांत्रिकासोबत मावशीला घनदाट झाडीत नेऊन जिवंत जाळले. यानंतर जंगल परिसरातच तिचा मृतदेह निर्जन जागी पुरल्याचे समोर आले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …