ठळक बातम्या

जनतेला ‘न्याय’ मिळेल या भूमिकेतून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे – थोरात

नाशिक – आपल्या तक्रारींची दखल घेतली जाते, तसेच न्याय मिळतो असे जनतेला वाटेल, अशा पद्धतीने महसूल विभागाने सेवा पुरवाव्यात, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यस्तरीय महसूल परिषदेच्या समारोपप्रसंगी केले. यावेळी त्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे विशेष कौतुक केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे आयोजित या कार्यक्रमास महसूल व वनविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृ ष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील बहुतांश विषय हाताळावे लागतात. त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असतो. तथापि, त्यांच्याकडे मोठी क्षमता असते, म्हणूनच त्यांच्यावर या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, असे प्रशंसोद्गार काढून कोविड काळातील जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामाची पावतीही यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले, सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राबवण्यात येणारे महाराजस्व अभियान अधिक विस्तारीत स्वरूपात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शेतकऱ्यांना सातबारा घरी नेऊन देणे, फेरफार निकाली काढण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि फेरफार अदालतीचे आयोजन, भूसंपादनाची गावपातळीवरील कमी-जास्त पत्रके अद्ययावत करणे, बिगरशेती प्रकरणे गतीने मार्गी लावणे, पाणंद, शिवार रस्ते मोकळे करणे, गाव तेथे स्मशानभूमी, दफणभूमीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, निस्तार पत्रकाच्या नोंदी अद्ययावत करणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या महत्त्वाच्या आठ बाबींचा यात समावेश आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात नाविण्यपूर्ण बाबी राबवण्याची संधीही यातून दिली जाणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …