मुंबई – मुंबईत कोरोना आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी चिकुनगुनियाचे प्रमाण मात्र वाढतच आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण झपाट्याने वाढले असून २१ ऑक्टोबपर्यंत १९ रुग्ण आढळले आहेत, तर वर्षभरात आतापर्यंत ३४ रुग्णांचे निदान झाले आहे.
डेंग्यू आणि चिकुनगुनिया या दोन्ही आजारांचा प्रसार ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला की चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही वाढते.
पालिकेच्या आकडेवारीमध्ये गेल्या वर्षांपर्यंत चिकुनगुनियाच्या रुग्णांची शून्य नोंद झाली होती, परंतु या वर्षी ऑक्टोबपर्यंत ३४ रुग्ण आढळलेले आहेत. सप्टेंबरमध्ये मुंबईत चिकुनगुनियाचे केवळ सात रुग्ण होते. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण झपाटयाने वाढले असून २१ ऑक्टोबपर्यंत १९ रुग्ण आढळले आहेत.गेल्या काही दिवसांपासून मुंबईत चिकुनगुनिया वाढत असून प्रामुख्याने पूर्व उपनगरीय भागांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या दृष्टीने प्रतिबंधात्मक कार्यवाहीही पालिकेने सुरू केली असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात हिवतापाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सप्टेंबरच्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे ६०७ रुग्ण आढळले होते, तर २१ ऑक्टोबपर्यंत ३१२ रुग्णांचे नव्याने निदान झाले असल्याचे सांगण्यात आले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …