ठळक बातम्या

गृहमंत्री वळसे-पाटलांनी केले पोलिसांचे कौतुक

मुंबई – गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवादविरोधी कारवाईला मोठे यश आले आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे या कारवाईत मोस्ट वाँटेड माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या कारवाईबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. पोलिसांनी जीवाची बाजी लावत २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले ही अभिमानाची गोष्ट आहे, त्यासाठी सर्व प्रथम मी पोलिसांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, गडचिरोलीमध्ये झालेल्या चकमकीमध्ये पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये सहा महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. २६ पैकी अद्याप काही नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. ही मोठी कारवाई असून, पोलिसांनी प्राणाची बाजी लावत ही मोहीम यशस्वी केली त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो, असे वळसे-पाटील म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …