गांधीनगर – गुजरातमधील द्वारकेमध्ये गुरुवारी ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ३.१५ वाजता हा भूकंप झाला. भूकं पात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू द्वारकेच्या उत्तर-वायव्येस २२३ किमी अंतरावर होता. भूकंपाचे धक्के जाणवताच स्थानिक नागरिक स्वत:चे संरक्षण करण्यासाठी उंच रस्त्यावर धावताना दिसले. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे गंभीर नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यातही गुजरातच्या जामनगरमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. आसाममधील तेजपूर येथेही गुरुवारी सकाळीच ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …